उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – उरण तालुकास्तरीय सनियंत्रण समितीच्या माध्यमातून तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, उनपचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटविकास अधिकारी निलम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उरणमध्ये तहसिलदारांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान पुरवठा मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे.
सरकारच्या लॉकडाऊन आदेशामुळे जे उद्योग व्यवसाय प्रभावीत झालेले तसेच बेरोजगार बेघर व्यक्ती विस्थापीत झालेले आदी कामगारांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र भुषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी उरण नगरपरिषद प्राथमिक शाळा क्र. 1 येथे शासकीय, खाजगी आस्थापना तसेच स्वयंसेवी संस्था त्याच प्रमाणे दानशुर व्यक्तींच्या सहाय्याने केंद्रीय किचन व्यवस्थेच्या सहाय्याने अन्नधान्य पुरवठा मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
या अन्नधान्य पुरवठा मदत केंद्राच्या माध्यमातून ज्या शासकीय अथवा खाजगी आस्थापना, स्वयंसेवी संस्था त्याचप्रमाणे दानशुर व्यक्तींना अन्नदान करण्याची इच्छा आहे. त्यांनी संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधावा असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लागलीच येथील आयओटीएल कंपनीने शंभर गोणी तांदूळ गोरगरीब तसेच गरजू कामगार व बेघरांकरीता मदत जाहीर केली आहे. अशाप्रकारे अन्नदान करून आपणही गोरगरीब गरजू कामगार, बेघर असलेल्याना सहाय्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. हा अन्नधान्य पुरवठा केंद्र सकाळी 9 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 8 पर्यंत सुरू राहणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper