Breaking News

ओरियन मॉलच्या शॉप अॅिण्ड विन स्पर्धेत प्रल्हाद राजपूत विजेते

पनवेल : वार्ताहर : पनवेलमधील ओरियन मॉलचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाग्यवान ग्राहकांसाठी शॉप अ‍ॅण्ड विन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते पनवेलमधील प्रल्हाद राजपूत ठरले आहेत. त्यांना ‘तनिष्क’च्या दोन लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचे पारितोषिक मिळाले.

पनवेलमधील ओरियन मॉलचा तिसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सायंकाळी 6 वाजता सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. या वेळी मंगेश परुळेकर, मानसी परुळेकर, मनन परुळेकर, मनांकी परुळेकर आणि दिलीप करेलिया उपस्थित होते. मॉलमध्ये खरेदी करणार्‍यांसाठी शॉप अ‍ॅण्ड विन स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. ओरियन मॉलबरोबर तनिष्क, क्लब महिंद्रा, मेपल हे या योजनेचे प्रायोजक होते. वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शॉप अ‍ॅण्ड विन स्पर्धेचा निकाल रविवारी (दि. 5) जाहीर करण्यात आला. त्याचे भाग्यवान विजेते पुढीलप्रमाणे घोषित झाले. प्रल्हाद राजपूत प्रथम क्रमांक ‘तनिष्क’चे रुपये दोन लाखांचे सोन्याचे दागिने, अरुण विशे द्वितीय क्रमांक रुपये एक लाखाचे ‘तनिष्क’चे सोन्याचे दागिने, सौरव सुनील तेलगे तृतीय क्रमांक क्लब महिंद्रा तर्फे तीन रात्र चार दिवस जोडीदारासह बँकॉक सहल आणि नीलेश वडनेरे चौथ्या क्रमांकाचे विजेते मेपल तर्फे सिक्थ जनेरेशन आय पॅड. यापैकी पहिल्या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकाचे विजेते पनवेलमधील असून, दुसर्‍या क्रमांकाचे विजेते कर्जत येथील आहेत.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply