Breaking News

फ्रीजमुळे बर्फाची मागणी गोठली

व्यवसायाला उतरती कळा; उत्पादक नाराज

रसायनी : प्रतिनिधी : मे महिन्यात रणरणत्या उन्हाने कहर केला असून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे.कडक उन्हाने नागरिकांना हैराण केले आहे. याकरिता शरीराला थंडावा मिळवण्यासाठी, तसेच शरीरात पाण्याची पातळी राखण्यासाठी थंड पाणी आणि शीतपेय यांच्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, मात्र घरोघरी फ्रीजचा वापर वाढल्याने बर्फ व्यवसायाला उतरती कळा  आली आहे.

रसायनी परिसरातील मोहोपाडा मिनीडोर थांब्याजवळ गेल्या 36 वर्षांपासून विश्वकर्मा बंधूंचे बर्फ विक्रीचे दुकान आहे. सध्या घरोघरी फ्रीजचा वापर होत असल्याने या व्यवसायाला उतरती कळा  आल्याचे त्यांचे म्हणणे आहे, परंतु काही वर्षाअगोदर रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील रिलायन्स, बकुळ, एचओसी आदी कंपनीत बर्फ पुरवठा करण्याचे काम विश्वकर्मा बंधूंकडून होत असे, परंतु प्रत्येक कंपनीत कुलिंग प्लँट असल्यामुळे आपल्या बर्फ व्यवसायाला उतरती कळा आली आहे.शिवाय एप्रिल ते मे महिना वगळता इतर महिन्यात बर्फाला अधिक मागणी नसल्याचे त्यांनी सांगितले.सध्या साखरपुडा, लग्नसमारंभ, ज्युस सेंटर, रसवंतीगृह यांच्याकडून मागणी आहे. सगळीकडे  फ्रीजचा वापर वाढल्याने बर्फाची मागणी कमी झाली आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply