पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची आदरांजली
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ जोमा पाटील (म्हात्रे) यांचे गेल्या वर्षी अल्पशः आजाराने निधन झाले. नावडे येथील निवासस्थानी रविवारी (दि. 24) त्यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
नावड्याचे लक्ष्मणशेठ पाटील (म्हात्रे) हे पनवेल तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते होते. प्रेमळ, मनमिळावू, मितभाषी आणि हसतमुख स्वभावाचे लक्ष्मणशेठ यांचे गेल्या वर्षी जुलै रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. तत्पूर्वी त्यांची पत्नी जनाबाई यांचे, तर त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र अविनाश यांचेही निधन झाले. काही दिवसांच्या अंतराने आई, वडील आणि मुलगा यांचे निधन झाल्याने नावड्यासह पनवेल तालुका हळहळला होता. या वेळी पनवेल पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी आदींनी आदरांजली वाहिली.