भाजप महिला अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी दिल्या शुभेच्छा
उरण ः बातमीदार
गव्हाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील यांनी उत्तम काम केले. कोरोना काळातही कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांच्यासारख्या उत्कृष्ट, उत्तम अधिकार्याची गव्हाण ग्रामपंचायतला नेहमी मदत झाली आहे , असे सांगत पनवेल भाजप महिला अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांनी ग्रामविकास अधिकारी यांना निरोप समारंभात पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गव्हाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील यांची बदली ग्रामपंचायत दूंदरे येथे झाली. त्यानिमित्ताने त्यांचा निरोप समारंभ सत्काराचा कार्यक्रम झाला. या वेळी एम. डी. पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, गव्हाण ग्रामपंचायत तसेच सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या वेळी कामगार नेते महेंद्र घरत, राजिप सदस्य रविंद्र पाटील, गव्हाण सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, माजी सरपंच जिज्ञासा कोळी, माजी उपसरपंच सचिन घरत, ग्रामपंचायत सदस्य हेमंत पाटील, अरुण कोळी, रोशन म्हात्रे, योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, शिल्पा कडू, सूनिता घरत, ज्येष्ठ नेते वामन म्हात्रे, ज्येष्ठ नेत्या मिनाक्षी कोळी, ग्रामविकास अधिकारी विजय राठोड, बालविकास विस्तार अधिकारी पूजा चौघुले उपस्थित होते.