Breaking News

ज्वेलर्स दुकानांची सुरक्षा धोक्यात!; पनवेल परिसरात दरोडे, लुटमारीच्या घटना

पनवेल : वार्ताहर

पनवेल परिसरात ज्वेलर्स दुकानांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या दुकानांत दिवसाढवळ्याही चोर्‍या, दरोडे पडत आहेत. यामध्ये मालकांवर हल्ला करून दरोडेखोर दुकानांतील माल लुटून नेत असल्याच्या घटना वाढत असल्याने ज्वेलर्स दुकानांच्या मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना अशा सराईत चोरांना पकडण्याचे आव्हान असून यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. ज्वेलर्सच्या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करून काही भामटे दुकानांची पाहणी करतात आणि ज्या ज्वेलर्स दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, सुरक्षा रक्षक नाहीत, अशाच ठिकाणी दरोडे टाकले जात आहेत. त्यामुळे ज्वेलर्स दुकानाच्या मालकांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. एक महिन्यापूर्वी पनवेल शहरातील झवेरी बाजारात दरोडा पडला, मात्र तरीही येथील दुकानदार जागृत नसल्याचे दिसून येत आहे. सण-उत्सव व लग्नसराईत पनवेलमधील ज्वलेर्स दुकानांमध्ये गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन ग्राहकाच्या वेशात आलेले भामटे चोर सोने घेऊन पसार होतात. काही वेळा भरदिवसा दुकान लुटण्याची घटना पनवेलमध्ये घडल्या आहेत. एक महिन्यापूर्वी भरदिवसा एका व्यापार्‍यावर हल्ला चढवीत सोने लुटले असल्याची घटना पनवेल येथील झवेरी बाजारात घडली आहे. त्याचबरोबर येथील दुकानदार लाखोंचे नाही, तर कोट्यवधी रुपयांचे सोने दुकानात ठेवतात, मात्र आपली सुरक्षा कशा प्रकारे करावी याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत, तर कुठे नाहीत. त्याचबरोबर काही दुकानदारांचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. तर काही कॅमेर्‍यांचे रेकॉर्डच बंद आहेत. या वेळी प्रत्येक दुकानात क्लोजसर्किट कॅमेरे असणे गरजेचे आहे.

पोलिसांसमोर आव्हान सराईत चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. याबाबत ज्वेलर्स दुकानदारांनीसुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे. पनवेल परिसरात मोठमोठ्या दुकानांच्या बाहेर बंदूकधारी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे आहे, मात्र असे सुरक्षा रक्षक प्रत्येक ठिकाणी असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे चोरटे आपला मोर्चा ज्वेलर्सच्या दुकानाकडे नेत संधीचा फायदा घेत लूट करीत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात पोलिसांकडून बैठक घेऊन दुकानदारांना आवाहन करण्यात येत आहे.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply