Breaking News

कामगार नेते जितेंद्र घरत यांचे अभीष्टचिंतन

पनवेल : रामप्रहर वृत्त

जय भारतीय जनरल कामगार संघटना व भाजप रायगड जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते जितेंद्र घरत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 9) मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सभागृहामध्ये त्यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेतील कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र नाईक, कामगार नेते विनायक मुंबईकर, अल्ताब शेख, भारतीय जनता पक्ष कामगार सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे, सहसंयोजक रवींद्र कोरडे, चंद्रकांत कडू, रायगड जिल्हा सचिव जगदिश म्हात्रे,  कामगार संघटना सचिव समीरा चव्हाण, रामदास गोंधळे, प्रशांत कदम, राम जाधव, विशाल वास्कर, अविनाश जाधव, दीपक पाटील आदी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply