खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 9) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताहाला राष्ट्रगीताचे सामुहिकरित्या गायन करून सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड, सर्व प्राध्यापकवृंद, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी व डी.एलएलई आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. या कार्यकमाचे आयोजन डी.एल.एल.ई. व राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत करण्यात आले. तसेच, या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी प्राध्यापकांचे कौतुक केले.