Breaking News

रोह्यात धावीर महाराजांचा पालखी सोहळा साधेपणाने; अडीच तासांत पालखी मंदिरात पुन्हा दाखल

रोहे : प्रतिनिधी

येथील ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव सोमवारी (दि. 26) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा झाला. पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर भाविकांनी शहरात ठिकठिकाणी सुरक्षित अंतर राखून पुष्पवृष्टी करून दर्शन घेतले. दसरा संपला की दुसर्‍या दिवशी श्री धावीर महाराजांचा पालखी उत्सव सुरू होतो. त्यानुसार  सोमवारी सकाळी पूजा-अर्चा व विधी झाल्यावर 6.30च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने प्रथेनुसार धावीर महाराजांना सशस्त्र सलामी दिली आणि भाविकांच्या गजरात, खालू बाजाच्या वाद्यात मंदिराला फेरी मारून पालखी शहराकडे मार्गस्थ झाली. या सोहळ्यास लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी महाराजांची पालखी रथामध्ये बसवण्यात आली होती. गर्दी न करता भाविकांनी लांबूनच दर्शन घेतले. दरवर्षी 24 तासांपेक्षा जास्त वेळ पालखी मिरवणुकीला लागत असतात, पण यंदा कोरोनामुळे दोन ते अडीच तासांतच पालखी मंदिरात पुन्हा दाखल झाली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply