उरण : प्रतिनिधी
भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण अर्थात जेएनपीएने भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने 10 ऑगस्ट 2022 रोजी सुरत येथे जेएनपीए सेझ इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022 चे आयोजन केले होते. या कॉन्क्लेव्हच्या आयोजनाचा उद्देश्य गुंतवणुकदारांना भविष्यातील विकास प्रकल्पांमध्ये मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि देशाच्या वाढत्या बंदर-आधारित औद्योगिकीकरणाचा एक भाग होण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देणे हा होता. बंदर आधारित अर्थव्यवस्थेस चालना देण्याच्या उद्देशाने जेएनपीएने आपल्या 277.38 हेक्टर फ्रीहोल्ड जमिनीवर बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प विकसित केला आहे, ज्यामध्ये बंदराच्या जमीन वापर योजनेचा समावेश आहे. हे औद्योगिक केंद्र भारतातील पहिले बंदर आधारित बहुउत्पादन कार्यरत एसईझेड आहे. एसईझेडमधील भरपूर संधी आणि विविध वैशिष्ट्यांविषयी माहिती देताना जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले बंदर आधारित औद्योगिकीकरणामध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करण्याच्या उद्देशाने जेएनपीए एसईझेडच्या या विशिष्ट प्रकल्पासह बंदर आधारित अर्थव्यवस्थेत आपली क्षमता आणि विकासाच्या पैलूंमध्ये वाढ करत आहे, जे सिंगल-विंडो क्लिअरन्सपासून मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीपर्यंत विविध सुविधा प्रदान करते. ज्यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये प्रभावी मार्ग आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होतात. जेएनपीए एसईझेड गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रोत्साहने देत आहे, जसे की आर्थिक कायदे जे देशाच्या इतर सामान्य आर्थिक नियमांपेक्षा अधिक उदार आहेत आणि पाणी आणि वीज पुरवठ्यासाठी अनुदानित दर आहेत. जेएनपीए सेझसाठी पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये विविध सर्व मूलभूत पायाभूत सुविधांचा समावेश होतो. या चर्चेच्या अध्यक्षस्थानी जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ होते. कार्यक्रमाला जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, नितिन बोरवणकर, सीईओ, जेएनपीए एसईझेड उपस्थित होते.