Breaking News

पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये आज भाजपत मेगाभरती

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांतील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचा रविवारी (दि. 29) भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. नवीन पनवेल, कळंबोली, पनवेल आणि मोहोपाडा येथे ‘मेगाभरती’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

भाजपच्या माध्यमातून केंद्रात व राज्यात होणारी विकासकामे, तसेच पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून होणारा विकास लक्षात घेता विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच अनुषंगाने रविवारी भाजपमध्ये मेगाभरती होणार आहे.

नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात सायंकाळी 4 वाजता होणार्‍या सोहळ्यात पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व शेकाप नेते संदीप पाटील, माजी नगरसेवक व पनवेल अर्बन बँकेचे माजी चेअरमन अजय कांडपिळे आणि समर्थक, दुपारी 3 वाजता कळंबोली मंगल कार्यालयात होणार्‍या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विजय खानावकर यांचे बंधू व राष्ट्रवादीचे नेते दिलीप खानावकर, शेकापच्या नगरसेविका राणी कोठारी यांचे पती कमल कोठारी, काँग्रेस नेते भीमसेन माळी, सुरेश फडके, संतोष ठाकूर व समर्थक प्रवेश करणार आहेत.

उरण विधानसभा मतदारसंघात जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी शेकडो रुपयांची विकासकामे करून आदर्शवत काम केले आहे. त्यांच्याही कार्याचा झपाटा दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सकाळी 11 वाजता पाटणोली विभागातील विविध पक्षांचे कार्यकर्ते पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे, तर सायंकाळी 4.30 वाजता रसायनी परिसरातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात होणार्‍या कार्यक्रमात भाजपत जाहीर प्रवेश करणार आहेत.

या सर्व पक्षप्रवेश सोहळ्यांना प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटीचे विश्वस्त व जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply