Breaking News

पनवेलमध्ये ‘आयएनएस विक्रांत’ची प्रतिकृती

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांची गर्दी

पनवेल ः प्रतिनिधी, वार्ताहर

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशात प्रथमच घरोघरी तिरंगा झेंडा फडकला. त्यामुळे या वर्षीची दिवाळीदेखील विशेष असून नागरिकांच्या मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवण्यासाठी पनवेल शहरात ओरियन मॉलमध्ये भारतीय नौदलातील युद्धनौका आयएनएस विक्रांतची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 15) झाले. उद्घाटन समारंभास महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, भाजप ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी मुंबई व रायगड विभाग महाव्यवस्थापक अपर्णा जोगळेकर, निवृत्त नेव्हल ऑफिसर कमांडर जसबीर सिंग, ओरियन मॉलचे मालक मंगेश परूळेकर, संचालक मनन परूळेकर, संस्कार भारतीचे डॉ. शैलेश भेंडे, प्रतिकृती साकारणारे सिद्धार्थ साठे, अ‍ॅड. अमित चव्हाण, विजय काळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारताची पहिली युद्धनौका म्हणून ओळख असलेल्या आयएनएस विक्रांतची युद्धकाळात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चला… दिपावलीचा आनंद द्विगुणित करूया, मनामनातील दीप उजळूया, राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवूया या घोषवाक्याचा आधारे ‘आयएनएस विक्रांत’ची प्रतिकृती ओरियन मॉलमध्ये उभारण्यात आली आहे. या युद्धनौकेच्या चलचित्रांचे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले आहे. संस्कार भारती, ओरियन मॉल आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण दिवाळीत तेे नागरिकांना पाहता येणार आहे. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन ओरियन मॉलचे मालक मंगेश परूळेकर व मनन परुळेकर यांनी केले आहे.

पनवेलकरांसाठी ऐन दिवाळीत ओरियन मॉलमध्ये ‘आयएनएस विक्रांत’ची प्रतिकृती ही चांगली भेट आहे. अनेक वेळा आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ती पाहू शकत नाही, परंतु आज या प्रतिकृतीतून तिची भव्यता व इतिहास नक्कीच डोळ्यांसमोर तरळतो.

-आमदार प्रशांत ठाकूर, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष

बँक ऑफ महाराष्ट्राला ही एक चांगली संधी मिळाली आहे. या प्रतिकृतीला उभारण्यासाठी हातभार लावण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले. आजच्या तरुण पिढीने मॉलमध्ये खरेदी करताना आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी व यातून देशभक्तीची स्फूर्ती घ्यावी.

-अपर्णा जोगळेकर, महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई व रायगड विभाग

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply