Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात परिसंवाद

खारघर ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात कार्यशाळा व परिसंवाद समितीमार्फत मंगळवारी (दि. 23) वित्त व लेखा विभागातील पदवीधारकांसाठी करिअरपाथ  या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

परिसंवादासाठी आयबीएस महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अमेय तनावडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वित्तीय क्षेत्रामध्ये असणार्‍या विविध करिअर संधीची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या परिसंवाद्वारे आपल्या शंकाचे निरसन करून घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना वित्तीय करिअर संधीचे लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षच्या समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. परिसंवादाचे आयोजन कार्यशाळा व परिसंवाद समितीचे समन्वयक प्रा.प्रेरणा सातव यांनी केले, तसेच प्रा. नम्रता परिक, निलम लोहकर यांनी सहकार्य केले.

संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरूणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. सिद्धश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply