लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात एलएलएम समन्वयक कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 23) झाले. या वेळी त्यांनी येत्या काळात आपले विधी महाविद्यालय नवी मुंबईतच नव्हे; तर संपूर्ण मुंबईतील उत्कृष्ट विधी महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला.
भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयास एलएलएम कोर्सची मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार या महविद्यालयात एलएलएम समन्वयक कक्ष सुरू झाला असून या कक्षाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य धनश्री कदम, इंजिनियर दर्शन ठाकूर, सहाय्यक प्राध्यापिका संघप्रिया शेरे, रवनीश बेक्टर, ममता गोस्वामी, हिमांशू मोरे, भाग्यश्री कांबळे, ग्रंथपाल जान्हवी भोईर, सहाय्यक ग्रंथपाल तेजस्विनी कारखानीस, पल्लवी खोत, ऋषिकेश हुद्दार, उज्ज्वल पाटील आदी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालयात दर्जेदार कायदा शिक्षण देण्यासंदर्भात विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.