Breaking News

म्हसळ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस 

म्हसळा : प्रतिनिधी

म्हसळा शहरासह संपूर्ण तालुक्यातील विविध भागांत बुधवारी संध्याकाळी ढगफुटीसदृष्य पाऊस पडला. दुपारी आकाशांत ढगांची जमवाजमव झाली, त्यानंतर जोरदार वारा, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळत होता. या वेळी महावितरणची बत्ती गुल झाल्याने बहुतांश भागात अंधाराचे सावट पसरले होते. अचानक आलेल्या या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडवली. म्हसळा तालुक्यात बुधवारी संध्याकाळी काही तासाच्या अवधीत 85 मिमी. पाऊस पडला. शहरांतील सखल भागात व  सदोष गटारे असलेल्या दिघी रोड, एसटी स्टँड, भाजी मार्केट, नगरपंचायत कार्यालयासमोरील गल्लींत आणि परिसरांत पावसाचे पाणी साठले होते. म्हसळा तालुक्यात अद्यापही सरासरी पर्जन्यमान पुर्ण होण्यासाठी किमान 1000 ते 1200 मिमी पावसासाची कमतरता आहे. मात्र बुधवारी झालेला हा पाऊस भातपिकाला पोषक आहे, हळवी भातपिके आद्याप निसवली नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. मागील सहा वर्षाच्या नोंदी पाहता म्हसळा तालुक्यात सप्टेंबर अखेर ते ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत  पाऊस पडला आहे. बुधवारी जोरदार पाऊस झाला असला तरी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीखाली कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचे निवासी नायब तहसीलदार जे. एम. तेलंगे यानी सांगितले.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply