Breaking News

दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रकचा अपघात

नवी मुंबई : बातमीदार

दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एका ट्रक चालकाने गाडी थेट दुभाजकावर घातल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. ही घटना ठाणे बेलापूर मार्गावर दुपारी 3 च्या सुमारास घडली. सुदैवाने गर्दी नसल्याने व अपघात उड्डाणपुलाच्या खाली झाल्याने फारशी वाहतूक कोंडी झाली नाही.

या अपघातात सुधाकर मढवी असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. सुधाकर हे ठाणे बेलापूर मार्गावर ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांना ओव्हरटेक करून एक दुचाकीस्वार त्यांच्या गाडीच्या मार्गिकेवर अचानक आला त्यामुळे सुधाकर यांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी आणि ट्रक मधील अंतर फार कमी असल्याने त्यांनी ट्रक थेट उजवीकडे वळवला. यात दुचाकीस्वार तर वाचला मात्र ट्रक दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला. अचानक उजवीकडे वळवल्याने दुभाजकाला धडकलेले चाक ही निखळलेच या शिवाय ट्रक चालक सुधाकर हे जखमी झाले त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.

गणेश विसर्जन झाल्याच्या दुसर्‍या दिवशी रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती त्यात उड्डाणपुलाखाली अपघात झाल्याने ठाणे बेलापूर मार्गावर अपघाताचा विपरीत परिणाम झाला नाही, अशी माहिती महापे विभागाचे वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी दिली. मात्र अपघात झाल्यानंतर बघ्यांची गर्दी मात्र झाली होती.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply