पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ’माय लाईफ माय योगा’वर आधारित आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष प्रभाग 19च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माय लाईफ माय योगा रेकॉर्डेड व्हिडीओ 2020 स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
सहा गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील प्रत्येक गटासाठी पारितोषिके जाहीर करण्यात आली होती. त्याप्रमाणे प्रथम क्रमांकास 5555 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 3333 रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 2222 रुपये व आकर्षक चषक तसेच उत्तेजनार्थ अशी एकूण 80 हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आयोजकांनी कळविले आहे. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व स्पर्धकांना पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, प्रभाग अध्यक्ष पवन सोनी यांनी धन्यवाद दिले आहेत.
गटनिहाय विजेते
12 ते 21 वर्षाखालील पुरुष गटात प्रथम क्रमांक देवराज पाटील, द्वितीय आदित्य वैष्णव कुळथे, तृतीय क्रमांक दिप्तांशू चव्हाण, तर उत्तेजनार्थ वेद गाला व वेदांत रमेश; 12 ते 21 वर्षाखालील महिला गटात प्रथम क्रमांक अन्गाश्री, द्वितीय प्रियांका जमराज, तृतीय क्रमांक जयश्री लांडे, उत्तेजनार्थ जिया डागा व मनस्वी; 21 ते 35 वर्षाखालील पुरुष गटात प्रथम कुलदीप सोढे, द्वितीय अताऊर रहमान, तृतीय नचिकेत सुगवेकर, उत्तेजनार्थ संकेत पाटील; 21 ते 35 वर्षाखालील महिला गटात प्रथम प्रिया सिंग, द्वितीय सारिका रांका, तृतीय क्रमांक गायत्री कार्ले, उत्तेजनार्थ मोनिका निकम व साधना फुलोरे, 35 वर्षावरील पुरुष गटात प्रथम क्रमांक संतोष शिर्के, द्वितीय हितेश चिप्पानी, तृतीय क्रमांक सूर्यकांत फडके, उत्तेजनार्थ सुनील गाडगीळ व गजानन काळे; 35 वर्षाखालील महिला गटात प्रथम क्रमांक सरिता पाटकर, द्वितीय अंजली देवानी, तृतीय संजना सकपाळ, तर उत्तेजनार्थ पारितोषिक ममता शुक्ला व ज्योती चौहान यांनी पटकाविला आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …