Breaking News

चोरी प्रकरणात दोघांना अटक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी सन्नी उर्फ डाकू विकास तरे (25) व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे. या दोघांनी नवी मुंबईच्या विविध भागांतून चार मोटरसायकल व सहा मोबाइल फोन चोरल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाहन चोरीला गेल्याची तक्रार 2 सफ्टेंबर रोजी दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोपरखैरणे सेक्टर-19 मधून आरोपी सन्नी उर्फ डाकू विकास तरे (वय 25) याला, तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले होते. या दोघांची चौकशी केली असता तुर्भे भागातून मोटरसायकलची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच कोपरखैरणे, नेरूळ आणि खारघर या भागातून तीन मोटरसायकल व सहा मोबाइल फोन चोरल्याचे त्यांनी कबूल केले आहे. पोलिसांनी या आरोपीकडून चार मोटरसायकल व सहा मोबाइल असा सव्वा चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.

Check Also

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील अवकाळी पाऊस, …

Leave a Reply