Breaking News

ओरियन मॉलमध्ये विक्रांत युद्धनौका प्रतिकृतीचे प्रदर्शन

पनवेल ः प्रतिनिधी

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष साजरा होत असताना देशात प्रथमच घरोघरी तिरंगा झेंडा फडकला. त्यामुळे या वर्षीची दिवाळीदेखील विशेष असून ओरियन मॉलमध्ये आयएनएस विक्रांत युद्धनौकेची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 15) सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.भारताच्या युद्धात आयएनएस विक्रांतची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. भारताची पहिली युद्धनौका म्हणून ओळख असलेल्या या युद्धनौकेच्या चलचित्रांचे प्रदर्शनदेखील ओरियन मॉलमध्ये भरविण्यात येणार आहे. संस्कार भारती, ओरियन मॉल आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी मुंबई व रायगड विभागातील महाव्यवस्थापक अपर्णा जोगळेकर, ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर उपस्थित राहणार आहेत.पनवेलकरांना संपूर्ण दिवाळीमध्ये हे प्रदर्शन पाहता येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘चला…दिपावलीचा आनंद द्विगुणित करुया, मनामनातील दिप उजळूया, राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवूया’ या घोषवाक्याचा आधारे आयएनएसची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.पनवेलकरांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन ओरियन मॉलचे मालक मनन परुळेकर आणि मंगेश परुळेकर यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply