Breaking News

वाकडी उपसरपंचपदी भाजपच्या रेणुका जमदाडे बिनविरोध

वाकडी उपसरपंचपदी भाजपच्या रेणुका जमदाडे बिनविरोध

पनवेल रामप्रहर वृत्त

वाकडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. 14) झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या रेणुका नामदेव जमदाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच रेणुका जमदाडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शिवाजी दुर्गे, सरपंच कुंदा पवार, माजी सरपंच नरेश पाटील, नामदेव जमदाडे, दुंदरेचे माजी उपसरपंच रमेश पाटील, शिरवलीचे सरपंच दीपक बोंडे, माजी उपसरपंच परशुराम रिकामे, लक्ष्मण पाटील, खानावचे उससरपंच बाळाराम पाटील, बाळअराम उसाटकर, मंगेश पाटील, सदस्य अ‍ॅड. अरुण पाटील, प्रभावती खुटले, प्रेरणा भोपी, नीतापाटील, पुष्पा सोपान जाधव, रधुनाथ वाघ, मंगेश पाटील, नारायण मढवी, शांताराम पोपेटा, संतोष पाटील, कृष्णा जमदाडे, कचेर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply