Breaking News

शेतकरी आणि सरकारमध्ये एका कॉलचं अंतर : पंतप्रधान

सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार : मोदी

नवी दिल्ली : वृत्तसेवा
केंद्र सरकारनं आणणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकर्‍यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. मागील काही दिवसांपासून आंदोलनाची धार वाढली असून, संसदेच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची चिन्हं आहेत. दिल्लीत हिंसाचार घडल्यानंतरही मोदींनी भाष्य करणं टाळलं होतं. मात्र, अखरे अधिवेशनाच्या आधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल मौन सोडलं.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झालं. मात्र, शेतकरी आंदोलनाविषयी सरकारच्या भूमिकेवर टीका करत विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधानांनी कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाबद्दल सरकारची भूमिका मांडली.
पंतप्रधान म्हणाले,मी नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकर्‍यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकर्‍यांनी यावर चर्चा करावी. त्यांनी शेतकर्‍यांना सांगितलं आहे की, शेतकर्‍यांपासून ते फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत, असं मोदी म्हणाले.
सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. सर्व विषयांवर चर्चा केली जाईल. सर्व पक्षांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली जाईल. कृषीमंत्री नरेद्र सिंह तौमर यांच्याकडून शेतकर्‍यांना देण्यात आलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे. शेतकर्‍यांसोबत चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. आपल्या समर्थकांना याबद्दल सांगावं. चर्चेतूनच तोडगा निघायला हवा. आपण सगळ्यांनी देशाबद्दल विचार करावा लागेल, असं आवाहन मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलं.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply