महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील महत्त्वाच्या काळीज खरवली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंचपदी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, तर सदस्य पदाच्या 13 पैकी 10 जाग जिंकून बाळासाहेबांची शिवसेनेने बहुमत मिळविले. महाड तालुक्यातील श्रीमंत आणि शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्या काळीज खरवली या ग्रामपंचायत निवडनुकीचा निकाल सोमवारी (दि. 17) जाहीर करण्यात आला. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत समीर महामुणकर (बाळासाहेबांची शिवसेना) समीर महामुणकर यांना 1053 तर चैतन्य महामुणकर (काँग्रेस, राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे शिवसेना, मनसे आघाडी) यांना 1096 मते मिळाली. आघाडीच्या उमेदवाराने केवळ 40 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यपदी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) चे 10 तर आघाडीचे तीन सदस्य निवडून आले. त्यामुळे काळीज खरवली ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद आघाडीकडे गेले असले तरी बहुमत शिंदे गटाचे आहे.