Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कामोठ्यात जोशी पॉलिक्लिनिकचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे सेक्टर 8 येथे डॉ. भावेस कृष्णा जोशी, डॉ. अमिषा स्वप्निल जोशी, डॉ. नसरीन पठाण यांनी जोशी पॉलिक्लिनिक, तर प्रिक अ‍ॅण्ड केअर पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटर डॉ. रामेश्वर गर्डे आणि डॉ. निकीता घरत यांनी सुरू केले आहे. या पॉलिक्लिनिक आणि पॅथॉलॉजी सेंटरचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1)
करण्यात आले. या वेळी शुभेच्छा देताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीकोनातून असलेल्या सर्व सुविधा जोशी पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला तसेच त्यांनी संबंधित डॉक्टर्सना जोशी पॉलिक्लिनिक आणि प्रिक अ‍ॅण्ड केअर पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटरच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या उद्घाटनाचे औचित्यसाधून मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सेंटरच्या उद्घाटनाचे औचित्यसाधून जोशी पॉलिक्लिनिक आणि प्रिक अ‍ॅण्ड केअर पॅथॉलॉजी कलेक्शन सेंटर, लक्ष्मी आय इन्सीट्यूट आणि मेडी सीक्युअरच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक गोपीनाथ भगत, हभप रामदास गोर्डे, समाजसेवक आर. जी. म्हात्रे, शरद जगताप, पोपटशेठ आवारी, संदीप पाचपूते, मनिषा वनवे, तांबडे माऊली, विनोद खेडकर, बाळासाहेब शिंदे, पांडुरंग सोनावणे, गणेश कवडे, विजय गोर्डे, अशोक मोहिते, रवि कडु आदी उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगीतले की, कामोठे परिसरात आरोग्या विषयची जागरूकता वाढत चालली आहे. कोरोनानंतर आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे याची जाणीव नागरिकांना होत आहे. त्यामुळे अश्या नागरिकांना आरोग्य सेवादेण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. नागरिकांची ही गरज जोशी पॉलिक्लिनिक आणि पॅथॉलॉजी सेंटरच्या माध्यामतून पूर्ण होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply