Breaking News

जांभिवलीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता कोंडीलकर

मान्यवरांकडून अभिनंदन!

पनवेल : रामप्रहर वृत्त

जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिनंदन केले.

पनवेल तालुक्यातील जांभिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपच्या अनिता अनंता कोंडीलकर यांनी राष्ट्रवादी-शेकाप आघाडीकडून वेदीका विनोद जाईलकर यांना पराभूत करून विजय मिळविला. त्याबद्दल मान्यवरांकडून अनिता कोंडीलकर यांचे अभिनंदन करण्यात आले.

या वेळी सरपंच रिमा रवींद्र कोंडीलकर, सदस्य शेखर जाधव, अमित कोंडीलकर तसेच दिलीप टकळे, मनोहर कोंडीलकर, धर्मा कोंडीलकर, मयुरेश कोंडीलकर, अनंता कोंडीलकर, केळवणे जि. प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, अमेश ढवळे, संजय टेंबे, रवींद्र कोंडीलकर, अनंता कोंडीलकर, शिल्पा म्हात्रे, जितेंद्र जाधव, मिलिंद शिर्केे, राहूल धारवे, संदीप गोडीवले, शेखर कोंडे, परशुराम गोडीवले, अनिल बोंबाले, दीपक कोंडीलकर, मनोहर मालुसरे, अशोक गोडीवले, मंगेश आवळे, लक्ष्मण शिंदे, कृष्णा कोंडीलकर, बळीराम कोंडीलकर, संजय कोंडीलकर, काळुदास माळी, कल्पेश कोंडीलकर, मारूती कोंडीलकर, दिलीप कोंडीलकर, जगदीश म्हसकर आदी उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply