Breaking News

जोकोव्हिच नवव्यांदा अंतिम फेरीत

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

सिडनी : वृत्तसंस्था
गतविजेता आणि अग्रमानांकित सर्बिया नोव्हाक याने रशियाच्या अस्लान करात्झेव्ह याचा 6-3, 6-4, 6-2 असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या 33 वर्षीय जोकोव्हिचने कारकीर्दीत 28व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आजे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत आठ वेळा अंतिम फेरीत पोहोचलेल्या जोकोव्हिचने जेतेपदावर नाव कोरले आहे. विशेष म्हणजे नऊ वेळा उपांत्य फेरीत त्याने अपराजित राहण्याची किमया साधली आहे.
ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पदार्पणातच उपांत्य फेरी गाठणार्‍या करात्झेव्हचे अंतिम फेरीत मजल मारण्याचे स्वप्न अधुरे राहिले. जोकोव्हिचसारखा अव्वल प्रतिस्पर्धी समोर असताना त्याचा निभाव लागला नाही. दुसर्‍या सेटमध्ये 1-5 अशा पिछाडीवर पडल्यानंतर करात्झेव्हने जोमाने पुनरागमन केले, पण जोकोव्हिचच्या झंझावातासमोर तो निष्प्रभ ठरला.
अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिचे कारकीर्दीतील विक्रमी 24वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न जपानच्या नाओमी ओसाका हिने धुळीस मिळवले. सेरेनालाला 3-6, 4-6 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. ओसाकाने चौथ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून, यापूर्वी तिने अमेरिकन (2019) आणि ऑस्ट्रेलियन (2019) ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले आहे.
अमेरिकेच्या 22व्या मानांकित जेनिफर ब्रॅडी हिने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हा हिचाअटीतटीच्या उपांत्य लढतीत 6-4, 3-6, 6-4 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply