Breaking News

सात वर्षांच्या स्वराची पाच किमी मॅरेथॉन दौड

तळोजा : रामप्रहर वृत्त
खारघर येथील जय हिंद फाउंडेशनच्या वतीने तळोजा येथील केंद्रीय राखीव पोलीस बल मैदानात पोलीस स्मृती दिनाचे औचित्य साधून पाच किलोमीटर अंतराच्या जयहिंद मॅरेथॉनचे आयोजन रविवारी (दि. 6) करण्यात आले होते. या स्पर्धेत कामोठे येथील रहिवासी दिलीप शेलार यांची सात वर्षांची मुलगी स्वराने सहभागी होत दौड पूर्ण केली. याबद्दल उपस्थित सर्वांनी तिचे कौतुक केले व राखीव पोलीस दलाचे पश्चिम क्षेत्र महानिरीक्षक रणजीत दत्ता यांच्या हस्ते तिला गौरवण्यात आले.
रणजीत दत्ता यांनी 102 बटालियन रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स ग्राउंड येथे झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली. या स्पर्धेत केंद्रीय राखीव पोलीस बलाचे जवान आणि अधिकारी त्याचप्रमाणे सामान्य नागरिकदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी राष्ट्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व पदक देऊन गौरविण्यात आले. या मॅरेथॉनच्या आयोजनासाठी जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप माने व त्यांचे सर्व सहकारी तसेच कामोठे येथील छाबा फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतलेे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply