Breaking News

भेंडखळ येथे जोपासली सामाजिक बांधिलकी!   

उरण : वार्ताहर

मरावे परी किर्तीरुपे उरावे  या उक्तीप्रमाणे भेंडखळ येथील कै. लक्ष्मण रमण ठाकूर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कुटुंबियांतर्फे वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  करण्यात आले. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात नेहमी सहभागी असणारे भेंडखळ गावचे सुपुत्र स्वर्गीय लक्ष्मण रमण ठाकूर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांच्या परिवाराकडून त्यांचा वारसा जोपासत मदत व सामाजिक बांधिलकी म्हणून रेशन सामान पनवेल नेरे येथील वृद्धाश्रम, संगीता नितीन जोशी सामाजिक व विकास संस्था स्नेहकुंज आधार गृह येथे त्यांची मुलगी प्रियांशी ठाकुर यांच्या हस्ते नितीन जोशी व अल्लाउद्दीन शेख यांच्या हाती सुपूर्त करण्यात आले.  कै. लक्ष्मण रमण ठाकूर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त  एका छोट्याशा  कार्याला सुरुवात केली. सोबत जरिमरी नवरात्रोत्सव मंडळ भेंडखळ व शिवप्रेमी ग्रुप भेंडखळ यांनीही  योगदान दिले. एकूणच या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेतला.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply