अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे तिसरी रिलायन्स करंडक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारपासून (दि. 30) ही स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धा मर्यादित 40 षटकांच्या सामन्यांची असेल. ही स्पर्धा रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची निवड चाचणी स्पर्धा असून यातील कामगिरीच्या आधारे रायगडचा संघ निवडला जाईल. सुरुवातीचे सामने जेएनपीटी उरण येथे खेळवले जाणार आहेत. प्रवेश फी सहा हजार रुपये आहे. रायगड जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या खेळाडूंनाच या स्पर्धेत खेळता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूच्या आधार कार्डची स्वसाक्षांकीत सत्यप्रत बरोबर आणणे आवश्यक आहे. नसल्यास खेळता येणार नाही. अधिक माहितीसाठी, शंकर दळवी 9422594141, 8484838988, प्रकाश पावसकर 9423377646, जयंत नाईक 9561099735, विवेक बहुतुले 9421158300 यांच्याशी संपर्क साधावा.