माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना भेडसावणार्या समस्या सोडविण्यात येत असून विविध सोयीसुविधा पुुरविल्या जात आहेत. त्या अंतर्गत पडघे गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि समाजमंदिर बांधकामाचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका क्षेत्रात विविध विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत 88 लाख रुपये निधीतून पडघे येथे स्त्याचे काँक्रिटीकरण आणि समाजमंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, तोंडरेचे माजी सरपंच राम पाटील, पडघेचे माजी सरपंच कृष्णा पाटील, दिलीप भोईर, गजानन पाटील, युवा नेते दिनेश खानावकर, माजी उपसरपंच पदू कांबळे, पांडू भोईर, नामदेव भोईर, गुरुनाथ भोईर, रघुनाथ भोईर, आशिष कडू, अॅड. पवन भोईर, नाथा भोईर, रूपेश कांबळे, कुणाल पाटील, प्रल्हाद भोईर, अंकुश पाटील, संजय कांबळे, राहुल कांबळे, विजय कांबळे, संतोष कांबळे, के. टी. भोईर, मनोहर पाटील, विष्णू पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.