Breaking News

रोटरी क्लबची अविस्मरणीय रोटरी फॅमिली नाईट

पनवेल : वार्ताहर

रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीयल टाऊन या सामाजिक सेवा करणार्‍या क्लबच्या 30व्या यशस्वी वाटचालीच्या वाढदिवसानिमित्ताने क्लबतर्फे एक अविस्मरणीय अशी रोटरी फॅमिली नाईट खांदा वसाहतीमधील अतिशय सुंदर अशा बेलेझा बँकेट हॉलमध्ये साजरी करण्यात आली.

या अविस्मरणीय रोटरी फॅमिली नाईटला पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, तसेच शहरातील नामवंत व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमात क्लबचेे सभासद व त्यांचे कुटुंबीय सदस्य यांनी व्यक्तिशः सहभाग घेऊन अनेक करमणुकीचे कार्यक्रम करून त्याचप्रमाणे त्यांच्यात असलेले हृदयस्पर्शी अंगभूत कलागुण प्रदर्शित करून सर्वांना थक्क केले. यात प्रामुख्याने हरहुन्नरी डॉ. जयकुमार भंडारकर, शेखर पन्हाळे, डॉ. संपत ससाणे, शुभांगी वालेकर, श्री. व सौ. जनार्धन यांनी विविध चित्रपटातील श्रवणीय गाणी गाऊन कार्यक्रमाला शोभा व रंगत आणली.

सगळ्यांनी छान रॅम्प वॉक केले. अपमा नार्वेकर आणि गणेशसिंग राजपूत यांनी कथाकथनाचा कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमाला क्लबचे प्रथम प्रेसिडेंट डॉ. पुरुषोत्तम जोगळेकर यांनी पाठविलेल्या शुभसंदेशाचे वाचन करून दाखविण्यात आले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हील रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीयल टाऊनच्या प्रेसिडंट वैशाली म्हात्रे व त्यांच्या क्लबच्या सभासदांनी कठोर परिश्रम करून मोलाचे सहकार्य व मदत केली. या कार्यक्रमाला रोटरॅक्ट क्लबचे प्रेसिडेंट शुभम मालपाणी आणि त्यांचे सभासद देखील उपस्थित होते. क्लबचे प्रेसिडंट व्ही. सी. म्हात्रे, शेखर पन्हाळे, श्रीनिवास कोडस, प्रकाश रणसिंग पाटील, मधुसूदन मालपाणी, सुधीर कांडपिळे, राजेंद्र कोलकर यांनी सगळ्यांनी गेल्या एका वर्षाच्या कालावधीत क्लबने फक्त सामाजिक सेवा हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून समाजोपयोगी केलेल्या जवळ जवळ 300 उपक्रमांचा आढावा घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे अध्यक्ष व्ही. सी. म्हात्रे, डॉ. जयकुमार भंडारकर, शेखर पन्हाळे, मधुसूदन मालपाणी, प्रकाश रणसिंग-पाटील इत्यादींनी व्यक्तिशः कठोर परिश्रम मेहनत करून मोलाची मदत केली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply