Breaking News

कोरोनाला रोखण्यासाठी उरणमध्ये दैनंदिन सर्व्हे

उरण : वार्ताहर

उरण शहरात कोरोना (कोविड-19) या विषाणूच्या आजाराने  उरण कोटगाव व जेएनपीटी टाऊनशिप येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या ठिकाणाचा सभोवतालच्या परिसराचा दैनंदिन सर्व्हे दररोज 14 दिवस सुरु राहणार आहे. या सर्व्हेकरीता एकूण 10 पथके तयार करण्यात आली आहेत. 

हा सर्व्हे सर्व नगरपरिषद, पंचायत समिती आणि आरोग्य विभाग यांच्यामार्फत संयुक्तरित्या होत आहे. एकूण 2643 कुटुंब आणि 11760 नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या नागरिकांचा 14 दिवस घरोघरी जाऊन दररोज सर्व्हे सुरु

राहणार आहे. कोरोना विषाणू आजाराची लक्षणे हि मुख्यत्वेकरून श्वसन संस्थेशी निगडीत आहेत व ताप, खोकला, श्वास  घ्यायला  त्रास होणे, निमोनिया काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे मुख्यत्वेकरून असून सर्व साधारणपणे हा आजार शिंकण्या, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्याद्वारे पसरतो. त्यामुळे शासनाने या विषाणूच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय जारी केलेले आहेत. त्या अनुषंगाने उरणमध्ये दैनंदिन सर्व्हे करण्यात येत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply