पनवेल ः प्रतिनिधी
गोवर रुबेला लसीकरण मोहीम पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात दोन टप्यामध्ये राबविण्यात येणार असून या मोहिमेची पहिली फेरी 15 ते 25 डिसेंबर व दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 15) पासून 150 जणांच्या टिमच्या साहाय्याने घरोघरी जाऊन गोवर प्रतिबंधात्मक लसीकरणास पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरूवात झाली आहे. राज्य शासनाकडील सूचनांनुसार विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहिम पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात गुरुवार पासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी महापालिकेने 150 जणांच्या टिमच्या साहाय्याने घरोघरी जाऊन गोवर प्रतिबंधात्मक लसीकरणास पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरूवात केली आहे. पहिली फेरी 15 ते 25 डिसेंबरपर्यंत असणार आहे. दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत असणार आहे. या लसीकरण मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, ज्या बालकांचे लसीकरण राहिले आहे अशा नागरिकांनी पुढे येऊन आपल्या बालकांचे गोवर-रूबेला लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे, तसेच आपल्या परिसरात गोवर-रूबेलाचे रूग्ण आढळल्यास महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास जरूर कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रोज 150जणांच्या टिमच्या साहाय्याने 14 हजार 735 घरांचे सर्वेक्षण याअंतर्गत केले जाणार आहे. यासाठी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार गोवर रुबेला लसीचा पहिला डोस 9 महिने ते 12 महिने या वयात, तर दुसरा डोस 16 महिने ते 24 महिने या वयात घेणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने बुधवारी सिटी टास्क फोर्सची बैठक आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. याबैठकित आशा वर्करर्स, एएनएम, जीएनएम यांनी योग्य तर्हेने सर्वेक्षण करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.