Breaking News

माणगावमध्ये इमारतीत आढळले रक्ताचे ठिपके

महालक्ष्मी निवारामधील प्रकार ः नागरिक भयभीत, घातपाताची शक्यता, तपास सुरू

 

माणगांव : प्रतिनीधी
माणगाव शहरातील उत्तेखोलवाडीत नव्याने निर्माण झालेल्या महालक्ष्मी निवारा कॉम्प्लेक्समध्ये 3 जानेवारी 2023 रोजी रात्रीच्या सुमारास काहीतरी भयानक प्रकार
घडला. या प्रकारामुळे महालक्ष्मी निवासामधील नागरीक भयभीत झाले आहेत. या इमारतीमध्ये जिने
आणि टेरेसवर रक्ताचे शिंतोडे पडल्याचे आढळले.
या कॉम्प्लेक्सच्या इमारत क्रमांक 3 च्या – विंग आणि इ विंगचे जिने आणि टेरेसवर रक्ताचे शिंतोडे आणि ठिपके 4 जानेवारी रोजी राहणार्‍या नागरिकांना दिसल्याने उत्तेखोलवाडी व महालक्ष्मी निवारा परिसरात एकच खळबळ माजली असून निवारा कॉम्प्लेक्समध्य महालक्ष्मी निवाराच्या सध्या 3 इमारतीमध्ये नागरिक आहेत. मात्र या रहिवासी लोकांची कोणत्याही प्रकारची गृहनिर्माण संस्था (सोसायटी) अद्यापपर्यंत रजिस्टर झालेली नाही. या बिल्डरकडून कॉम्प्लेक्स परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे निकामी झाले आहेत. कॅमेरे दुरुस्ती करून घ्यावे अशी मागणी रहिवासी नागरीकांनी बिल्डर आणि व्यवस्थापनाकडे करून देखील दुर्लक्ष केल्याने घडलेल्या प्रकाराचे गूढ उलगडण्यास विलंब हात आहे, अशी माहिती स्थानिक रहिवाश्यांनी पत्रकारांना दिली.तसेच या कॉम्प्लेक्सचे जबाबदार रहिवासी सलील चव्हाण पत्रकाराना म्हणाले की हा प्रकार कदाचित 3 जानेवारी रात्री 11च्या दरम्यान घडला असावा..! तर मग सुरक्षारक्षक कुठे होते? ही पण चिंतेची बाब आहे.
विशेष म्हणजे इमारत क्रमांक3 च्या – विंग आणि इ विंगच्या जिने आणि टेरेसवर आढळलेल्या रक्तांच्या ठिपक्याप्रमाणे असे ठिपके उत्तेखोल वाडीची एन्ट्री व महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण रायगड जिल्हा कार्यालयासमोरील रस्त्यापर्यंत दिसून आले आहे. प्रथमदर्शनी पाहता हे रक्त मानवी असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची दखल घेत माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताचे
नमुने गोळा करून तपासाची सूत्रे हलविली आहेत.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply