Breaking News

श्रमसंस्कार शिबिराचा भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते प्रारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
जे लोकांच्या उपयोगी पडतात त्यांचे आदर्श घ्या असा मोलाचा सल्ला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांना दिला. रयत शिक्षण संस्थेच्या पनवेलमधील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘विशेष श्रम संस्कार शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.
युवकांचा ध्यास: ग्राम शहर विकास यासंदर्भात आयोजीत करण्यात आले हे शिबीर शांतीवन येथे 4 ते 10 जानेवारी दरम्यान होणार आहे. या श्रम संस्कार शिबीराचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॅडी सदस्य तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते बुधवारी उद्घाटन झाले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, प्रा. धनंजय कोकीळ, प्रा. लक्ष्मण राठोड, प्रा. डॉ. किर्ती म्हात्रे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply