Breaking News

मोहोपाडा तलावाला मद्यपींचा विळखा

मोहोपाडा : प्रतिनिधी
मोहोपाडा परिसरातील वासांबे देवी ही ग्रामस्थांचे श्रध्दास्थान आहे. तलावाकाठी गावदेवीचे मंदिर आहे. मंदिराजवळील मोकळ्या जागेत तसेच गणपती विसर्जन घाटावर सायंकाळी मद्यप्राशन करणार्‍या तळीरामांचा वावर दिसून येत असून या ठिकाणी संध्याकाळच्या काळोखाचा फायदा घेत तळ्यावर तळीराम मद्यपान करताना दिसून येत आहेत. यामुळे येथून जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांमध्ये विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी सकाळ व संध्याकाळी ग्रामस्थ फेरफटाका मारण्यासाठी येत असतात. तेव्हा या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ असा कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. शिवाय हा कचरा तळ्यातील पाण्यात टाकलेला आढळतो व काही तळीरामांकडून मद्याच्या रिकाम्या बाटल्या फोडून टाकल्यामुळे काचा अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसत आहेत. याबाबत ग्रामसभेमध्ये मोहोपाडा ग्रामस्थांनी या तळीरामांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती. संध्याकाळच्या वेळेस रसायनी पोलिसांनी या ठिकाणी गस्त घालून तळीरामांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, मोहोपाडा परिसरातील नागरिकांनी तळीरामांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार मोहोपाडा पोलिसांनी तलाव परिसरात गस्त ठेवली होती. आता पुन्हा तळीरामांनी येथे ठिय्या केल्याने कारवाईची मागणी होत आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply