अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
कामोठे भारतीय जनता पक्ष आणि संस्कार महिला संस्थेच्या वतीने हळदी कुंकू समारंभ कामोठेमधील सुषमा पाटील विद्यालयात मंगळवारी (दि. 14) झाला. या समारंभाचे उद्घाटन अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले असून, या सोहळ्याला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कामोठे शहर संस्कार महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका कुसूम म्हात्रे यांच्या माध्यामतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांसाठी पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रेखा लिपनाळे या विजयी झाल्या, तर ललीता धुपलपुडी उपविजेत्या ठरल्या या दोघींना माजी नगरसेविका कुसूम म्हात्रे यांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा चिटणीस आशा भगत, पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, डिझाईनेर अश्विनी पाटील, कामोठे शहर महिला मोर्चा अध्यक्ष वनिता दिलीप पाटील, उपाध्यक्ष साधना आचार्य, रश्मी भारद्वाज, चिटणीस दिपाली तिवारी, खजिनदार नंदा पाटील, फतिमा आलम, ओबिसी सेल अध्यक्षा वनिता म. पाटील, समाजसेविका हरजंदर कौर, वैशाली घोलप, अनिता शेट्टी, कामोठे सोशल मिडीया सहसंयोजीका तृप्ती चौरे, 7 स्टार पार्लच्या संचालीका शालु चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.