Breaking News

करंजाडे येथे किड्स डेन स्कूलचे स्नेहसंमेलन

पनवेल : बातमीदार : किड्स डेन स्कूल, करंजाडे या शाळेचा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुदेशना सेनगुप्ता उपस्थित होत्या. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

करंजाडे सेक्टर 6 येथील किड्स डेन स्कूलमध्ये  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत केल्या गेलेल्या विविध स्पर्धा आणि

उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून करंजाडेचे सरपंच रामेश्वर आंग्रे उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध कला संस्कृतीवर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या वेळी स्कूल कमिटी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply