Breaking News

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेस पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल परिसरात भाजप-शिवसेना युतीतर्फे रविवारी (दि. 9) स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या गौरव यात्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर मोटरसायकलवर स्वार होऊन सहभागी झाले होते. या गौरव यात्रेच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयजयकाराने पनवेल परिसर दुमदुमून गेला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजप-शिवसेनेतर्फे राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आल्या. पनवेल परिसरातही यात्रा गौरवरथाच्या माध्यमातून रविवारी निघाली. खारघर येथून सायंकाळी 5 वाजता या गौरव यात्रेला सुरुवात झाली. या ठिकाणी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने गौरव यात्रेचे स्वागत करण्यात आले. अल्पसंख्याक महिला व युवा कार्यकर्त्यांनी या गौरव यात्रेवर पुष्पवृष्टी केली.
गौरव यात्रेत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, सरचिटणीस विक्रांत पाटील, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष वर्षा नाईक, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगरसेवक-नगरसेविका, विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सावरकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांच्यासह भाजपचे समाजसेवी अमजद खान, अय्याज मुजावर, मोअज्जम मुजावर, रिहान शेख, सलमान खान, हिना शेख, सफिया मुजावर, तसलीम शेख, फरीदा शेख, फातिमा शेख, उमेर शेख आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. गौरव यात्रा खारघरनंतर कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल अशी फिरून पनवेल येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पुष्पवृष्टी होऊन समारोप असे नियोजन करण्यात आले होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply