Breaking News

सावळेतील शेकाप युवा कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाची विकासाची विचारधारा तसेच भाजप जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन रसायनी विभागातील सावळे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, भाजप गुळसुंदे जि.प.अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष माळी, सचिन केदारी, अंकुश झिंगे, सतिश म्हस्कर, विजय कुरंगळे, रामचंद्र केदारी, लहू महाराज म्हस्कर, जयवंत महाराज म्हात्रे, प्रभाकर जांभुळकर, अंकुश म्हस्कर, सुदाम भंडारकर, नारायण म्हस्कर, किरण केदारी, विशाल बार्शी, राम गाताडे, रोहिदास तोडे, राहुल जांभुळकर, विशाल केदारी, हर्ष म्हस्कर आदी उपस्थित होते. या वेळी शेकापचे युवा कार्यकर्ते अक्षय अनंत केदारी, गजानन दामोदर जांभुळकर, नयन सुदाम भंडारकर, आकाश गजानन जांभुळकर, राज केदारी, योगेश गडगे, राहुल जांभुळकर यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्वांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत करण्यात आले.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply