Friday , September 22 2023

मराठी भाषा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनास प्रतिसाद

मुंबई : प्रतिनिधी

मराठी भाषा दिनानिमित्त चुनाभट्टी येथे आराध्य लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे भव्य पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नीला उपाध्ये उपस्थित होत्या. या वेळी कवी अरुण म्हात्रे यांचा मराठी कवितेचा सांगेतीक इतिहास शब्द शब्द जपून ठेव हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला. नगरसेविका सान्वी तांडेल आणि माजी नगरसेवक विजय तांडेल तसेच ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. पुस्तक प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. ते 7 मार्चपर्यंत सुरू आहे.

या वेळी डॉ. रवींद्र शिसवे यांनी आयोजकांना धन्यवाद देत सांगितले की, असे साहित्यिक कार्यक्रम सातत्याने होत राहिले पाहिजेत. त्यामुळे मराठी भाषेतील गोडवा इतर भाषिकांनाही समजेल आणि मराठी भाषा अधिक समृद्ध होईल. नीला उपाध्ये यांनी सांगितले की, मराठी भाषा वाचवायची असेल तर प्रत्येकाने सर्वांशी मराठीत बोलले पाहिजे. मराठीतून व्यवहार केले पाहिजेत. आपली स्वाक्षरीदेखील मराठीत केली पाहिजे. शेवटी ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांनी आभार मानले.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply