पनवेल, उरणमध्ये परिसरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती शुक्रवारी पनवेल तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंत्तीनिमीत्त सुकापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती 2023, पालदेवद ग्रुप ग्रामपंचायतीच्यावतीने तक्षशिला बुद्धविहार येथे तसेच ओम शिवा कॉम्प्लेक्स यांच्या वतीने धम्मगिरी बुद्धविहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, केतन केणी, चेतन केणी, पुष्पा म्हसकर, प्राची जाधव, पूनम भगत, भाजपचे सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, प्रमोद भगत, प्रवीण सावंत, प्रिया वाघमारे, प्रमोद सावंत, के. सी. पाटील, मयूर कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
महामानवाच्या जयंतीदिनी सीकेटीत विविध कार्यक्रम
पनवेल : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात (स्वायत्त) सेलीब्रेशन ऑफ नॅशनल डेज समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 14) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रा.जी.एस.साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाबद्दल माहिती दिली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस.के.पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए. डी. वाठारकर यांनी केले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री उद्धारासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. या सत्रासाठी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. व्ही. एस. कांबळे हे प्रमुख वक्ते लाभले होते. या वेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा आढावा घेत त्यांच्या कार्याबद्दल व जीवन चरित्राची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रिया चौधरी (एस. वाय. बी. एस. सी.) हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेलीब्रेशन ऑफ नॅशनल डेज समितीचे प्रमुख प्रा. एस. एल. खैरनार तसेच प्रो. डॉ. यू. टी. भंडारे, प्रा. एम. एम. आंबुलगेकर, डॉ. आर.ओ. परमार, महाविद्यालयाचे ग्रंथपाल आर. ए. नवघरे, प्रा. एस. एस. कांबळे, प्रा.जी. एस. साठे, डॉ. जे. एम. पावरा, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक गणेश जगताप व समितीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.)एस.के.पाटील, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.बी.डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर यांनी कौतुक केले. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे प्रमुख, विविध विभागाचे प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
उरणमध्येही बाबासाहेबांना अभिवादन
उरण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे साजरा करण्यात आली. त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, माजी नगरसेवक रवी भोईर, कौशिक शाह, राजेश ठाकूर, प्रदीप नाखवा, सागर मोहिते, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843चे अध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष हरेश जाधव, चिटणीस विजय पवार, सामाजिक कार्यकर्ते महेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ठाकूर, उरण नगर परिषदेचे कर्मचारी, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843 चे सर्व सदस्य, माता रमाई महिला मंडळ कमिटी अध्यक्ष सुनिता सपकाळे, हर्षद कांबळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, उरण शहरात ठीक-ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.