Breaking News

सर्वांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी-आमदार प्रशांत ठाकूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीत सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेले कार्य, दलित, बहुजन समाजासाठीचे त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे. ज्या समर्पित वृत्तीने त्यांनी काम केले ते न भूतो न भविष्यती असे आहे. त्यामुळे सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. शुक्रवारी (दि. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये मिरवणुकीनंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पनवेल महापालिका आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून, लोकसहभागातून ढोल-ताशांच्या गजरात लेझीम, चित्ररथासह भव्य मिरवणूक पनवेल शहरातून काढण्यात आली होती.
सकाळी 7.30 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, युवामोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यांच्यासह अनेकांनी अभिवादन केले.
या मिरवणुकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित चित्ररथ बनविण्यात आले होते. याबरेाबरच रमाबाई महिला मंडळ, शिवाजीनगर यांनी सामुहिक गायन केले. या मिरवणुकीची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ करण्यात आली. या ठिकाणी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी महापालिकेच्यावतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध संघटना, महिला मंडळे, पोलीस विभाग, वाहतूक पोलीस, वर्गणीदार सर्वांचे आभार मानले, तसेच मिरवणुकीतील स्पर्धेत सहभागी झालेल्या ढोल-ताशा मंडळे, लेझीम पथके, चित्ररथ आणि वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे क्रमांक जाहीर आले. या वेळी माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना बुद्धपौर्णिमेला होणार्‍या कार्यक्रमांमध्ये बक्षीस वितरण होणार असल्याचे घोषित करण्यात आले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply