पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईसह पनवेलमधील अनेक भागातील वीजपुरवठा बुधवारी (दि. 19) सायंकाळी खंडित झाला होता. तळेगाव ते खारखर या विजेच्या मार्गात बिघाड झाल्याने नवी मुंबईत वीजपुरवठा खंडित झाला. शहरात सध्या 750 मेगावॅटचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे शहरात लोडशेडींग सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. सध्या एमएसईबी तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. 750 मेगव्हॅटचा तुटवडा असल्याने नवी मुंबईतील विजपुरवठा सलग दोन ते तीन तास खंडित होऊ नये यासाठी वेगवेगळ्या भागातील वीज ही अर्धा-तीन एक तास रोटेशन पद्धतीने खंडित केली जात आहे. सुमारे दोन ते तीन तासांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …