रोह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये
नागोठणे : बातमीदार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले कुशल नेतृत्व सिद्ध केले असून कृतीतून टीकाकारांचे तोंड बंद केलेले आहे. ते जे बोलतात ते करून दाखवितात. त्यामुळे देशातील जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. 12 कोटी सदस्य असलेला एकमेव भाजप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये एक नंबरचा पक्ष आहे, असे अभिमानास्पद उद्गार भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. ते बुधवारी (दि. 19) रोहा तालुक्यातील पुई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमास आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजप रायगड लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, दिलीप भोईर, मारूती देवरे, श्रेया कुंटे, सरचिटणीस मिलिंद पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस बबलूशेठ सय्यद, भाजप रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, संजीव लोटणकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास असे सूत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवलंबले असून अनेक योजना सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी यशस्वीपणे राबविल्या आहेत, असे सांगून सर्व प्रवेशकर्त्यांच्या पाठीशी भाजप ठाम उभा राहील व आवश्यक असलेली विकासकामे मार्गी लागतील, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
या वेळी आमदार रविशेठ पाटील म्हणाले की, आता पुई गावापासून झालेल्या पक्षप्रवेशाची घोडदौड थांबणार नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत आपल्याला 50 हजार मतांची आघाडी मिळालीच पाहिजे. यापुढे आपण कुणाचीही मक्तेदारी चालून देणार नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे. पुई गावातील विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी म्हटले की, मोठेपणाचा तोरा दाखवून गोरगरीबांवर दहशत निर्माण करण्याचे दिवस आता संपलेले आहेत. गांधी-नेहरू यांच्यासारख्या मोठ्या घराण्यांची मक्तेदारी संपली असून एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते हे सर्व जगाने पहिले आहे. जनता सुज्ञ झालेली आहे. पूर्वीचे राजकारण आता चालणार नाही. जो सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अडचणी सोडवेल तो खरा राजकारणी. पुई गावातील सर्व अडचणी आम्ही सोडवू. काही काळजी करू नका. आता कड्या लावण्याचे दिवस संपले आहेत. बिनधास्तपणे भाजपवाढीसाठी कामाला लागा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
या वेळी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनंतराव सानप, दिनकर सानप, समीर पडवळ, विठ्ठल पवार, विनायक दिवेकर, सचिन दिसले, शशिकांत लहाने, अलोक दिवेकर, विश्वास लहाने, संदेश मोहिते, मंगेश सानप, नरेश लहाने, मंगेश वाघावले, कुणाल कदम, विशाल मोहिते, अनिकेत शिर्के, अभिषेक सानप, हरेश महाडिक, संदीप शिर्के, रमेश दिवेकर, सचिन लहाने, राजेंद्र कदम, विकास सानप, प्रकाश पाटील, संतोष दिवेकर, दत्ताराम भनगे, आत्माराम वाघमारे, परशुराम जाधव, केतन मोहिते, प्रथमेश कदम, रितेश शिर्के, महिला कार्यकर्त्या छाया सानप, विद्या दिसले, शमिका लहाने, मानसी सानप, मानसी मोहिते, सुजाता वाघावले, वृषाली लहाने, प्राची पाटील यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले.