Breaking News

गव्हाण विद्यालयात आरओ प्लांटची उभारणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा अरुण घरत यांच्या 2021-22मधील 15वा वित्त आयोगच्या निधीतून आरओ प्लँट उभारणी व गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या निधीतून पत्राशेड उभारण्यात आली आहे. या कामाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 19)झाले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आरओ प्लांटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणी उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त केले.
पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या तथा भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक कामे मार्गी लगत आहेत. त्यानुसार त्यांच्या 15वा वित्त आयोग 2021-22च्या निधीतून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये आरओ प्लांट तसेच गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या निधीतून पत्राशेड उभारण्यात येणार आहे. चार लाख 76 हजार 500 रुपये खर्चून आरओ प्लांट तर दोन लाख 53 हजार 747 रुपये शेड उभारण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत.
या वेळी रयतचे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य आबासाहेब देशमुख, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, गव्हाणच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, न्हावेचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, मुख्याध्यापिका एस. ए. डोईफोडे, स्कूल कमिटी सदस्य विश्वनाथ कोळी, मुख्याध्यापिका प्रणिता गोळे, ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, पी. आर. काजमी, माजी सरपंच सचिन घरत, मोरू नारायण विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सदस्य सुनीता घरत, स्कूल कमिटी सदस्य अनंता ठाकूर, लाईफ मेंबर जोत्स्ना ठाकूर, पनवेल पंचायत समिती सहाय्यक अभियंता स्नेहल धुपकर, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार राठोड, अंकित घरत, व्ही. के. ठाकूर, पी. के. ठाकूर, किशोर पाटील, रामदास ठाकूर, फडतरे सर, मनीषा घरत, सुनीता घरत, वामन म्हात्रे, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे प्राचार्य मुक्ता खटावकर, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापक स्वप्नाली म्हात्रे, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष नामदेव ठाकूर, गोळे मॅडम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply