Breaking News

पेणमध्ये वारली कला कार्यशाळा

पेण : प्रतिनिधी

गार्गी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे नुकताच आंबेघर (ता. पेण) येथे वारली कला कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्वःनिर्मितीचा आनंद हा जेवढा आनंददायक असतो, तेवढाच तो जगण्याच्या पध्दतीला आराम देणारा असतो, असे डॉ. पाटील यांनी या वेळी सांगितले.

आंबेघर पेण येथील अंकुर ट्रस्ट, चाईल्ड हेवन या संस्थेच्या मुलांंसाठी गार्गी फाऊंडेशनने वारली कला कार्यशाळेचे आयोजन केले होते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या कविता निधी ठाकूर यांनी  संस्थेच्या मुलांना व कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष हातात ब्रश देऊन संस्थेच्या आंबेघर येथील वास्तूच्या संरक्षक भिंतीवर वारली चित्र काढून ते रंगवायला शिकविले.

या कार्यशाळेत गार्गी पाटील, श्वेता देसाई, गौरी दळवी, मिनल सांडे, प्रकाश पाटील, सिद्धु सपकाळ, ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह अंकुर ट्रस्ट, चाईल्ड हेवन या संस्थेच्या मुलांंनी सहभाग घेतला. डॉ. वैशाली पाटील यांनीही वारली पेंटिंग करून आनंद लुटला.

Check Also

चित्रपटाचे यश अन् सेलिब्रेशन

चित्रपट सुपर डुपर हिट होण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक अर्थात प्रेक्षक. या प्रेक्षकांना चित्रपट आवडला रे …

Leave a Reply