Breaking News

मुरूडमधील इंटरनेट सेवा बंद

दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहार 10 दिवस ठप्प

मुरूड : प्रतिनिधी

निसर्गरम्य मुरूड शहर व परिसरात आपली हक्काची जागा असावी असे अनेकांना वाटते. त्यामुळे मुरूड तालुक्यात जागा खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्याद्वारे शासनाला सर्वाधिक महसूल मिळतो, मात्र गेल्या 10 दिवसांपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात एकाही खरेदी खताची नोंद झाली नाही. पर्यायी इंटरनेट सेवा घेण्याचा आदेश नसल्याने दुय्यम निबंधक कार्यालयातील सहकारी कर्मचार्‍यांना निवांत बसावे लागते, अशी खंत अधिकारी  बारे मॅडम यांनी व्यक्त केली.

गेल्या 15 दिवसांत माझे अशील पाच वेळा खरेदीखत करण्यासाठी मुरूड दुय्यम निबंधक कार्यालयात गेले होते, मात्र काम होत नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यातून तातडीने पर्यायी मार्ग काढावा, अन्यथा सर्व वकील व स्टॅम्प विक्रेते आंदोलन करतील.

-अ‍ॅड. मोहन तांबडकर, मुरूड

बीएसएनएल कार्यालयाची दशा

मुरूडमधील बीएसएनएल कार्यालय गेले अनेक दिवस वीजपुरवठा नसल्याने बंद होते. वीज बिल न भरल्याने महावितरणने या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला होता. आता वीज बिल भरले आहे, मात्र अनेक महिन्यांचे भाडे न दिल्याने जागा मालकाने या कार्यालयाला टाळे ठोकले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply