Breaking News

शिवाजीनगरची पाणी समस्या लागणार मार्गी

  • उभारण्यात येणार्‍या भव्य जलकुंभ
  • लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर गावातील ग्रामस्थांना आणि विषेश करून महिलांना पाण्याची समस्या उद्भवू नये या करीता नवीन जलकुंभ उभारण्यात येणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शिवजीनगर ग्रामस्थांच्या माध्यमातून हे जलकुंभ बांधण्यात येणार आहे. या जलकुंभाच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 7) झाले.

शिवजीनगर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानात हे जलकुंभ उभारण्यात येणार आहे. यामध्ये खालची पाण्याची टाकी एक लाख 80 हजार लीटची तर वरची टाकी 80 हजार लिटरची असणार आहे.

या भूमिपूजनावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, उपाध्यक्ष व्ही. के. ठाकूर, जयवंत देशमुख, मोतीलाल कोळी, स्वप्नील ठाकूर, साईचरण म्हात्रे, पी. के. ठाकूर, टी. के. ठाकूर, शनिदास ठाकूर, किशोर ठाकूर, नंदा ठाकूर, शोभा ठाकूर, रणजित ठाकूर, सुरेश ठाकूर, सुनील ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, बाळकृष्ण ठाकूर, अमित कडू, हरजीवन ठाकूर, शुभांगी ठाकूर, वंदना ठाकूर, आशा म्हात्रे, शैला ठाकूर, गीता ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

अतिशय महत्त्वाचा असा पाणीप्रश्न आता मार्गी  लागणार आहे. पाणी हे गावात कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला मिळाले पाहिजे. यासाठी गावकर्‍यांनीही शिस्त पाळली पाहिजे. त्यामुळे जपून पाणी वापरावे. या जलकुंभाच्या बांधकामाला सुरुवात होऊन दिवाळीपर्यंत म्हणजे येत्या सहा महिन्यामध्ये हे काम झाले पाहिजे.

-लोकनेते रामशेठ ठाकूर

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply