Breaking News

नावडे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

भाजप युवा नेते शुभम खानावकर यांचे वाढदिवस अभीष्टचिंतन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे युवा नेते शुभम सुरेश खानावकर यांचा वाढदिवस गुरुवारी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. त्याअंतर्गत नावडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.
दरम्यान वाढदिवसानिमित्त तसेच प्रभाग क्रमांक 2 च्या युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभम खानावकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. शैक्षणिक साहित्यांचा वाटपावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भुपेंद्र पाटील, युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, सुरेश खानावकर, कृष्णा पाटील, नंदू म्हात्रे, नितेश पाटील, भरत खानावकर, बळीराम खानावकर, तुकाराम खानावकर, पंढरीनाथ खानावकर, मदन खानावकर, विशाल खानावकर, शुभम खानावकर, प्रभाकर खानावकर, परशुराम खुटारकर, नीरज खानावकर, तुषार खानावकर, राजेश पाटील, हेमंत कांबळे, प्रशांत खानावकर, शुभ पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply