Breaking News

रायगड पोलीस दलाच्या ताफ्यात 42 नवीन वाहने

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड पोलीस दलाच्या ताफ्यात सोमवारी (दि. 13) 42 नवीन वाहने दाखल झाली. त्यामध्ये 20 चारचाकी तर 22 दुचाकींचा समावेश आहे. यासाठी 1 कोटी 81 लाख 50 हजार रुपये इतका निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पोलीस मुख्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी जे. डी. म्हेत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply